विविध उपक्रमांनी लोकायतने साजरी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

पुणे :कोणत्याही महापुरुषांची जयंती साजरी करायची असेल तर त्याची सर्वांत चांगली पद्धत ही आहे की, त्यांच्या विचारांना समजून घेणे आणि त्यांच्या संघर्षाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे. याच उद्देशाने सलग 4 दिवस लोकायतने भीम गाथा शाहिरी जलसा, नृत्य, पुस्तकांच वाचन, स्टिकर अभियान अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी केली.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण डेक्कन येथील कलाकार कट्टा, गोखलेनगर, नाना पेठ, गंज पेठ येथे झाले. या सादरीकरणात वायरमन रोहित, अंगणवाडी मदतनीस शकुतंला, झेरॉक्स दुकानात काम करणारी जयश्री, नर्स असणारी सुनंदा, मास विक्री करणारा कुणाल, ऑफिस बॉय विकास, पी.एम.टी कंडक्टर असलेला शंकर, संगणक अभियंता असलेली उझ्मा कार्यकर्ते सहभागी होते.
बाबासाहेबांच्या महाड येथील चवदार तळे आंदोलनाचा उल्लेख करत हजारो वर्षापासून बहुजन समाजाला गुलामीच्या मानसिकतेत खितपत पाडणाऱ्या मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहनही यावेळी करण्यात आले. या वेळी वस्तीतील नागरिकांनी सामूहिकपणे संविधानाची प्रास्तविकेच वाचन केलं.
तर महात्मा फुले पेठ येथील तरुणांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्टिकर घरोघरी जाऊन घराच्या दारावर चिटकवले.

तसेच बाबासाहेबांच्या साहित्याचे वाचन लोकायतच्या नळस्टॉप ऑफिसला झाले. एफ.सी.रोड व जंगली महाराज रस्त्यावर बाबासाहेबांबदलची माहितीपत्रक देऊन नागरिकांशी संवाद साधला.
सर्व कार्यक्रमांना नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद होता.
आत्मसन्मान मिळवून देणारा, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारा, महिला व कामगारांचा अधिकार मिळवून देणारे, घटनाकार अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुरंगी पैलू समजायला मिळाले अशी मत विविध उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांनी व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: