कयूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये रसायनशास्त्र विभागाची भरीव कामगिरी

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग ५०१ ते ५५० च्या गटात

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक स्तरावर महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्यू एस वर्ल्ड रँकिंग आजवर अनेक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले असून आता विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागानेही मागील वर्षीच्या तुलनेत भरीव कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. रसायनशास्त्र विभागाला यंदा ५०१ ते ५५० च्या गटात स्थान मिळाले आहे. मागील वर्षी हा विभाग ५५१ ते ६०० च्या गटात होता.

आंतरराष्ट्रीय रँकिंग एजन्सी क्वाक्वेरेली सायमांडस (क्यू एस) ही जगभरातील विद्यापीठांची क्रमवारीत ठरवते. नुकतीच या एजन्सीने २०२२ या वर्षीची विषयानुसार क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाला मागील वर्षीच्या तुलनेत ५० ने अलीकडचे स्थान मिळाले आहे. एकूण १५४३ विद्यापीठ आणि संस्था वेगवेगळ्या ५१ विषयांमध्ये या क्रमवारीत आहे. त्यातून रसायनशास्त्र विभागाला ५०१ ते ५५० च्या गटात आहे. रसायनशास्त्र विषयात भारतात विद्यापीठ १४ व्या स्थानावर असून आधीच्या स्थानांवर आयआयटी व आयएएस सारख्या संस्था आहेत. विशेष म्हणजे राज्य विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या क्यू एस क्रमवारीत विद्यापीठांचे मूल्यांकन तेथील संशोधने, प्राध्यापक वर्ग, आंतरराष्ट्रीय पोहोच, शैक्षणिक कामगिरी आदींच्या माध्यमातून ठरवली जाते.

जागतिक स्तरावर विद्यापीठ सातत्याने स्वतःला सिद्ध करताना दिसत आहे. रसायनशास्त्र विभागाने केलेली कामगिरी ही अभिमानास्पद असून मला खात्री आहे की भविष्यात अन्य विभागही अशाच प्रकारे विद्यापीठासाठी भरीव योगदान देतील. – डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Leave a Reply

%d bloggers like this: