राज ठाकरे यांनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरा मधील भोंगे हटवा अशी भूमिका घेतली होती त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले. त्यावर भोंगे हटाव ही मोहीम धार्मिक नाही तर सामाजिक आहे. देशातील न्यायव्यवस्थेपेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर ३ तारखेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर जशास तसं उत्तर देऊ असा पुनरुच्चार करत राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. 
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात आणि देशात कुठल्याही प्रकारची दंगल नको. 1  मे रोजी संभाजीनगरला जाहीर सभा घेणार आहे.आणि पाच जूनला मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आयोध्येला जाणार आहे. मुस्लिमांना देशातल्या सर्वोच्च न्यायालयापेक्षा त्यांचा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिल्या जाईल. असा इशाराही मुस्लिम समाजाला राज ठाकरे यांनी दिला.
जे भोंगे लागतात त्यांचा त्रास काही फक्त हिंदूंना होत नाही तर काही मुस्लिम बांधवांना देखील होतो असं म्हणत जर यांना भोंगे महत्वाचे असतील तर जश्याच तसे उत्तर द्यायला हवं. मात्र आम्हाला राज्यात शांतता भंग करायची नाही, आम्हाला राज्यात कुठल्याच दंगली करायच्या नाहीत मात्र जर ते ऐकत नसतील तर आम्ही ३ मे पर्यत वाट पाहू आणि उत्तर देऊ असा इशारा राज ठाकरे यांनी  दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: