fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsPUNE

लीला पुनावाला फाउंडेशनकडुन १,४०० हून अधिक गरजू व गुणवंत मुलींना शिष्यवृत्ती प्रदान.

पुणे : लीला पुनावाला फाऊंडेशन (एलपीएफ) ने नुकतीच पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बंगळुरूमधील १४०० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती दिली आहे, ही शिष्यवृत्ती गुणवत्तेसह गरज या निकषावर देण्यात आली. यात इंजीनियरींगमध्ये अंडरग्रॅजुएशन डीग्री, डिप्लोमानंतर इंजीनियरींग, फार्मर्सी, नर्सिंग, सायन्स आणि पोस्टग्रॅजुएशन डीग्री घेणार्या गुणवंत परंतु आर्थीकदृष्या दृर्बल अश्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली.

या वर्षीचा शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळा १० कार्यक्रमांमध्ये विभागला गेला होता. या समारंभात एलपीएफच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पुनावाला, संस्थापक व विश्वस्त फिरोज पुनावाला, एलपीएफचे विश्वस्त मंडळ, एलपीएफच्या सीईओ प्रिती खरे, एलपीएफचे बोर्ड ऑफ ट्रस्टी, वरिष्ठ कॉर्पोरेट भागीदार ,शिष्यवृत्ती निवड समिती सदस्य यांच्या हस्ते आणि हितचिंतकच्या उपस्थीतमध्ये पार पडला. आपल्या २६ व्या वर्षात पदार्पण करणार्या एलपीएफ ने आजतगायत १२,२०० हून अधिक मुलींना सक्षम बनवण्याचे ध्येय गाठले आहे. फाउंडेशन मुलींना गुणवत्ता आणि गरज या अनुशंगाने शिष्यवृत्ती व कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे व्यावसायिक शिक्षणसाठी पाठिंबा देते, याचसोबत शिक्षणास पूरक असे टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान देखील करते. जे की त्यांना भविष्यासाठी तयार करण्याचे कार्य आहे. आज फाउंडेशनच्या अनेक मुली कॉर्पोरेट, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था आणि जगभरातील जगप्रसिद्ध संस्थांशी संबंधित असुन आता त्या यशस्वी लीडर बनल्या आहेत. याचसोबत त्या चांगल्या नागरीक म्हणुन कुटुंब व सभोवतालच्या समुदायांना आधार देण्याचे कर्तव्य देखील पार पाडत आहेत.

या सर्व मुली यशाकडे वाटचाल करणर्या एलपीएफ कुटुंबाच्या आजीवन सदस्य आहेत. एलपीएफच्या अध्यक्षा आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्त्या लीला पुनावाला म्हणाल्या, या वर्षांतील आमचे प्रामाणिक प्रयत्न, आमचे कॉर्पोरेट भागीदार आणि हितचिंतकांच्या योगदानाशिवाय शक्य झाले नसते. या कॉर्पोरेट भागीदारांनी आम्हाला आवश्यक निधी तर दिलाच आणि सोबतच समग्र धोरणात्मक भागीदारी देखील केली. ज्यामध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांची स्वयंसेवा, मार्गदर्शन आणि आमच्या मुलींसाठी इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या संधींचा समावेश आहे. मी आमच्या समविचारी संस्था आणि देणगीदारांना सोबत येण्याचे आवाहन करते जेणेकरून अधिकाधीक पात्र मुलींना त्यांच्या व्यावसायिक शिक्षण पुर्ण करता येईल आणि त्यांचे आवडते करिअर व स्वप्न पुर्ण करता येईल .

Leave a Reply

%d bloggers like this: