महिला कलाकारांच्या ‘मॉन्टेज : एक पेंटिंग प्रदर्शन’चे 21 ते 23 एप्रिल दरम्यान बालगंधर्व येथे आयोजन

पुणे : अर्चना चौगुले, नीना सिंग आणि शिल्पा लडकत या पुण्यातील तीन महिला कलाकारांचे ‘मॉन्टेज’ हे  चित्रप्रदर्शन येत्या 21 ते 23 एप्रिल 2022 दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे भारवण्यात येणार आहे. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात कलाकार अजय देशपांडे आणि अभिनेत्री दिव्या सेठ यांच्या हस्ते 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

या तिन्ही कलाकार अष्टपैलू असून अजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकत्रितपणे व्यावसायिक कला प्रवास सुरू केला आहे. अर्चना चौगुले या अभियंता असून कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर त्यांनी कलाप्रवास सुरू केला. जैविक दृष्ट्या प्रत्येक मानवी चेहरा अद्वितीय असतो. त्यातील वेगळेपण टिपायचे ही चौगुले यांची खासियत आहे.

नीना सिंग या एक कलाकार, लेखिका, कला संरक्षक, कला समीक्षक, शिक्षणतज्ज्ञ आहेत. या प्रदर्शनात त्यांच्या लँडस्केप्स हे जबलपूर आणि पुणे शहराचे एकत्रीकरण असून, भेडाघाट जबलपूर आणि एम्प्रेस गार्डन पुणे येथील निसर्ग चित्र असणार आहेत. शिल्पा लडकत या कला शाखेतील पदवीधर आहे. निसर्ग चित्र व प्रामुख्याने ‘कमळ’ यांवर आधारीत त्यांची चित्रे या प्रदर्शनात असणार आहेत. आपल्या कलेतून सकारात्मकता, आनंद आणि आनंद पसरवणे हा त्यांच्या उद्देश आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: