हिंदुत्व आमचा अजेंडा नाही, हिंदुत्व आमचा श्वास – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : आज कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला. यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला तर भाजपच्या सत्यजीत कदमयांचा पराभव झाला. यावर “हिंदुत्व आमचा अजेंडा नाही, हिंदुत्व आमचा श्वास आहे, आम्ही या पराभवाचं विश्लेषण करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही एकट्याने ७७ हजार मते मिळवली, विरोधकांच्या तोंडाला फेस आणला आहे. शेवटपर्यंत अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पण हिंदुत्व आमचा अजेंडा नाही, हिंदुत्व आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्ही हिंदुत्वावरच निवडणूक लढवली आहे. कोल्हापुरातील पहिल्या आमदार झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, या निवडणुकीत भाजपने चांगले प्रयत्न केले. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. भाजपने सत्यजीत कदम यांना ७७४११६ मतं मिळाली आहेत. तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत झाली तिन्ही पक्षाने स्वतः उमेदवार आहोत असे लढले आहेत. तरीही आम्ही इतकी मत घेतली. आम्ही या तिन्ही पक्षांना फेस आणला असल्याचे पाटील म्हणाले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: