चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्या सोबत जाईन – जयंत पाटील

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजयी झाल्या आहेत. या निकालानंतर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘पराभव झाला तर मी हिमालयात जाईन’,असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांची आठवण करून देत ‘दादा हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन, तिथली सोय पाहून येईल’, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना लगावला.

जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना कोथरूडचा मतदार संघ देखील सोडावा लागेल असं वाटतंय, इतकी आपुलकी येथे दिसतेय. महाविकास आघाडीने कोल्हापुरात एकसंघ पद्धतीने काम केले आहे. पुरोगामीत्वाकडे महाराष्ट्र झुकलेला आहे. हा निकाल म्हणजे याचेच द्योतक आहे. करवीर नगरीने दिलेला निकाल हा मार्गदर्शक आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. या निकालातून त्यांना चपराक मिळाली. महाविकास आघाडीच्या कामांमुळे हा विजय झाला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, आम्ही खंबीर आहोत. प्रत्येकाची श्रध्दा असते. आम्ही देखील प्रभू रामांना मानतो. आमच्यातही हिंदुत्वाचा भाग आहे. परंतु,आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचे आमच्यावर संस्कार आहेत असे जयंत पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांच्या पुणे भेटी संदर्भात बोलताना ते म्हणाले, 30 वर्षे यांना हनुमान चालिसा आठवली नाही. भाजप जे सांगत आहे ते राज ठाकरे करत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: