… तरी देखील जाधव ताई चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत एन्ट्री केली आहे. त्यावर ‘या कोल्हापूर पोटनिवडणुकीत स्वतः उद्धव ठाकरेंनी लक्ष घातलं होतं. काही झालं तरी यश आम्हाला मिळणार, आशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेल.काही वेगळे विषय घेऊन जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्यातून मत मिळतात की काय, असा ही प्रयत्न झाला. तरी देखील या संगळ्यांवर मात करीत जाधव ताई चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, कोल्हापूर विधानसभा पोट निवडणूकित मुश्रीफ सतेज पाटील यांनी चांगले श्रम घेतले. त्यांनी एकोप्याने ठेवण्याचे काम केले आणि निवडणूक चांगली लढवण्याचे काम केले त्याचे यश आपल्याला पाहायला मिळत आहे.