डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन

 

पुणे:भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप यांनी पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. तसेच संपूर्ण पुणे शहरातील जनतेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना प्रशांत जगताप म्हणाले की, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे पहिले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी पुणे शहरातील सर्व जनतेला शुभेच्छा देतो. सर्वांनी मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करावी. मागचे २ वर्ष जयंती साजरी करता आली नाही मात्र ह्या वर्षी विविध सामाजिक, आणि लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” हा संदेश सर्वांनी आत्मसात करावा.

भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र राज्यशास्त्र, समाजशास पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. आणि आजही त्यांचे लिखाण हे सर्वांनाच मार्गदर्शक आहे. आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालवूया, प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याची व यापुढील काळात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद शपथ घेऊया असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी शहराध्यक्ष .प्रशांत जगताप,मा.आमदार कमलनानी ढोले पाटील, नगरसेवक प्रदीप गायकवाड ,प्रवक्ते प्रदीप देशमुख ,आनंद सावाने,दिपक कामठे,भोलसिंग अरोरा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: