fbpx

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने १० हजार अल्पोपहार, पाणी बाटल्यांचे वाटप

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांना अल्पोपहार, तसेच १० हजार पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी होत होती. यंदा जयंती महोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा झाला. जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम म्हणून फेडरेशनचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या पुढाकारातून हजारो भीम अनुयायांना अल्पोपहार आणि पाणी पुरविण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, ‘रिपाइं’ शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, ऍड. मंदार जोशी, संयोजक दिनेश जाधव, बाळासाहेब लांडगे, श्रीकांत पाटोळे, दयानंद नाईकनवरे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब जानराव म्हणाले, “या ठिकाणी गोर-गरीब वर्ग बाबासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो. त्यांना अन्न व पाणी पुरण्याचा उपक्रम राबविण्यात आला. जयंतीच्या निमित्ताने विधायक उपक्रम राबविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाने केला. दिनेश जाधव यांच्यासह पक्ष कार्यकर्त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.”

दिनेश जाधव म्हणाले, “कोरोनानंतर प्रथमच जयंती उत्साहात होत असल्याने वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचे ठरवले. येथे हजारो अनुयायी अभिवादनासाठी येतात. त्यांना अल्पोहर आणि पाणी वाटप केले. सगळ्यांनी चांगले सहकार्य केले.”

Leave a Reply

%d bloggers like this: