शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण : एका यू ट्यूब चॅनलच्या पत्रकाराला अटक 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत सुर्यवंशी असं या पत्रकाराचे नाव आहे. हा मुळचा साताऱ्याचा असून त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी त्याला मुंबईत आणले जाणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत 115 जणांना अटक करण्यात आली आहे.

या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातूनही ही अटक झाल्याचे बोलले जात आहे. पुणे पोलिसांनी ही अटक केली आहे. चंद्रकांत सूर्यवंशी हा भारती विद्यापिठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव पठार या ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त निलोप्तल यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुर्यवंशीचे MJT नावाचे यू ट्यूब चॅनल आहे. शरद पवरांच्या सिल्वर ओक या निवासस्थाची रेकी केल्याचा सूर्यवंशीवर संशय आहे.

या प्रकरणी 115 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. 109 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता पुणे कनेक्शन समोर आले आहे. पुण्यातून एका पत्रकाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पण हा पत्रकार सातारा येथील असून पुण्यात तो लपून बसला होता असं सांगितलं जातं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: