शिवसेना नेते रघुनाथ कुचीक बलात्कार प्रकरण : चित्रा वाघ यांना कुचीक यांची नोटीस 

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील पिडीतेने काल घुमजाव केल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चित्रा वाघ यांनीच हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचे पीडितेने सांगितल्याने एक नवीनच वाद निर्माण झाला. या वादाचा पार्श्वभूमीवर आज सकाळीचं कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांनी चित्रा वाघ यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करून याबाबद माहिती दिली आहे. यामध्ये चित्रा वाघ यांनी लिहिली आहे की, “आज सकाळीचं कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली. दुसरीकडे माझ्यावर वर कसा गुन्हा दाखल करता येईल यावर खलबतं सुरू आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग नाही का?” असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: