fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

पायतान हाना, पण मला नेता म्हणा, महिलांचे रक्षण आहात का भक्षण? – संगीता तिवारी यांची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका 

पुणे : “भाजपाच्या वाचाळ नेत्या ज्यांना काम करण्यापेक्षा पब्लिसिटी स्टंट करण्याचा खूप शौक आहे. काही गोष्टीतील सत्यता न पडताळता फक्त घाणेरडे राजकारण करून प्रसिध्दी मिळवणे हाच ह्या बाईंचा धंदा आहे. पायतान हाना, पण मला नेता म्हणा”, अशी बोचरी टीका कॉँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. तसेच “तुम्ही महिलांचे रक्षण आहात का भक्षण?”, असा सवालही त्यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.   

शिवसेनेच्या नेत्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणारी पीडिता काल अचानक माध्यमांसमोर आली अन् तिने चित्रा वाघ यांनी आपल्याला हे सर्व करायला लावले असा आरोप केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संगीता तिवारी बोलत होत्या. त्या म्हणाल्या,  “वाघ बाईंनी सदर पीडितेला जबरदस्ती बोलायला लावले, तिला गोव्याला अहमदकाका आणि पवारने डांबून ठेवले. तिला बेशद्ध करण्याची सारखी इंजेक्शन दिले. एवढंच नाही तर पुण्यात आल्यावर काय बोलायचे, पोलिसानंवर काय बोलायचे हे चित्रा ताई स्क्रिप्ट करून सांगत होत्या. आता हे सर्व कोर्टा मध्ये कळेलच”.

पुढे बोलताना तिवारी म्हणाल्या, “ताई नेहमीच बिचाऱ्या पीडित महिलांना तोंड बांधून प्रेस समोर बसवून त्या मुलींना प्रश्न विचारून आणखीन लज्जित करून किती दिवस राजकारणाची पोळी भाजणार आहात? त्या मुलीवर आणि नेत्यावर तुम्ही पाळत ठेवून कुठे ब्लॅकमेल तर करत नाही ना? असा प्रश्न उभा राहतो आमच्या पुढे. ती मुलगी काय बोलते किंवा तिचा बोलविता धनी कोण आहे हे कोर्टा समोर येईलच. पण चित्रा ताई मात्र सरकार आणि पोलिसांच्या विरोधात सुपारी माफिया सारख्या आक्रमक असतात. अहो ताई जरा दमाने. कधी कधी आती घाई संकटात नेई”.

तुमचे मानसिक संतुलन ढळले असे वाटते आहे. ह्या ब्लॅकमेल माफियावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच पाहिजे. दूध का दूध ऑर पानी का पानी लवकरच कोर्टात होईलच. पण ह्या माफिया बाईने तिच्या घरच्या लोकांना वेठीस धरून ब्लॅकमेल करू नये ह्याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे.
पिडीतेनी केलेले आरोप हे अत्यंत गंभीर आहेत. त्यावर पोलिसांनी कडक कारवाई ही केलीच पाहिजे, अशी मागणीही संगीता तिवारी यांनी केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading