राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची चित्रा वाघ यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात पीडितेने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून वाघ यांच्यावर टीका होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहरच्या वतीने आज पुणे पोलिस आयुक्तलय येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील पिडीत महिलेला संरक्षण मिळावे तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे नमूद करण्यात आले आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष किशोर कांबळे, आनंद सागरे, अमोल जाधव स्वप्निल थोरवे, स्वप्निल जोशी, निलेश रुपटक्के, रोहन पायगुडे, गोविंद जाधव, कुलदीप शर्मा, विनोद सकट, सौरभ गुंजाळ तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थिती होते.

किशोर कांबळे म्हणाले, पीडीतिची फसवणूक केल्याबद्दल आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल करत आहोत. आम्ही चित्रा वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी व पिडीतेला पोलीस संरक्षण मिळावं याचीही मागणी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: