अनेक दिवसानंतर चंद्रकांतदादा उद्या पुण्यात

पुणे: भाजपचे प्रदेश व आमदार चंद्रकांत पाटील हे मागच्या एक महिन्यापासून कोल्हापूर मध्ये मधील उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कोल्हापुरात प्रचारात व्यस्त होते. चंद्रकांतदादा हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांचे कोल्हापुरात वर्चस्व परत राखण्यासाठी त्यांना कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचारात लक्ष देणे गरजेचे होते.
चंद्रकांत दादा एक महिन्यापासून पुण्यात नसल्यामुळे कोथरूडकरांनी चंद्रकांत दादा हरवले आहेत तुम्ही परत या अशी बॅनरबाजी सुद्धा केली.
एका बॅनरमध्ये चक्क चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावून ‘हरवले आहेत’ असा उल्लेख देखील करण्यात आला होता. “पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा. समस्त कोथरुडकर असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला होता. चंद्रकांत दादा हे बऱ्याच दिवसानंतर पुण्यात येत असल्यामुळे ते पुणेकरांशी काय संवाद साधणार याची उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: