रघुनाथ कुचीक बलात्कार प्रकरण : चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करा – रुपाली पाटील ठोंबरे

पुणे: शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या ट्वीटमध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांनी “कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप,डांबून ठेवणे, फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी, अॅपचा वापर करून एसएमएस पाठवणे, खोटे एसएमएस तयार करणे, खोटी तक्रार देण्यास भाग पाडणे यावरून चित्रा वाघ यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा” अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: