Friday, June 19, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण : माझ्याविरोधात सगळे एकत्र आले याचा आनंद 

पुणे : शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने घुमजाव केला आहे. त्यामुळे या पिडीत मुलीच्या बाजूने महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना मोठा हादरा बसला आहे. यावर “माझ्याविरोधात सगळे एकत्र आले याचा आनंद आहे. मी सगळ्या चौकशीसाठी तयार आहे” असे चित्र वाघ यांनी सांगितले आहे.

चित्रा वाघ यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. यामध्ये चित्रा वाघ यांनी लिहिली आहे की, “रघुनाथ कुचिक प्रकरण पीडितेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले. खरंतर वाईट वाटलंय पण हरकत नाही असे ही अनुभव येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहिले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्याविरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशीसाठी तयार आहे”

दरम्यान आज, रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने धक्कादायक खुलासा केला आहे. महम्मद अहमद अंकल आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले असल्याचा खुलासा पीडित तरुणीने केला. गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने मला डांबून ठेवले गेले होते. एवढंच नाहीतर पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी भाग पाडले होते. चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहे, विशिष्ट यंत्रणा वापरुन माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईल वरुन मला मेसेज येत आहेत. सोमवारी भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने एक पत्र आणून दिले जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती माझ्यावर करत आहेत, असे आरोप आज पीडितेने चित्रा वाघ यांच्यावर केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading