स्वतःच न्यायव्यवस्था असल्यासारखं वागलं की काय होतं ते आज पाहिलं – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : पु्ण्यातील रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीनं तिचं वेगळं मत व्यक्त केलं आहे. त्यावरून पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. “या प्रकरणाचं राजकीय भांडवलं केलं गेल आहे. पीडितेने तक्रार नोंदवल्यानंतर तिच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे तपासून घेण्याच काम न्याय यंत्रणेचं असतं. पण स्वतःच न्यायव्यवस्था असल्यासारखं वागलं की काय होतं ते आज पाहिलं”,अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चित्रा वाघ यांच्यावर नाव न घेता टीका केली.
आज पुण्यातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्या म्हणाल्या, जितक्या लवकर होईल किंवा पीडितेची मानसिक तयारी होईल तेव्हा कलम १६४ अंतर्गत तिचा जबाब नोंदवून घेतला जातो. आपल्याकडे तक्रार आल्यानंतर आपण पोलिसांकडे तक्रार देतो. पण या घटनेत असं दिसंय की आधीच्या घटनेपेक्षा या मुलीनं वेगळा जबाब नोंदवला आहे. युनायटेड नेशन्सनं किंवा सर्व राष्ट्रीय महिला आयोग असतील यांनी कायम पीडित मुलीवर विश्वास ठेवायला हवा.
दरम्यान, एक दिशाभूल करण्याचं वातावरण तयार केलं गेलं की पीडितेला कोणीच मदत केली नाही. २५ फेब्रुवारीला पीडित मुलीचा मला फोन आला तिच्याशी मी २५ ते ३० मिनिटं बोलले. तिची तब्येत बरी नसल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यानंतर तिच्या इच्छेनुसार तक्रारीसाठी मी पोलिसांशी संपर्क साधला, असंही यावेळी गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
