Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारच – राज ठाकरे

राज्य सरकारला राज ठाकरेंचा अल्टिमेटम 

मुंबई : मशिदीवरचे भोंगे उतरवा ही माझी भूमिका आधीपासून होती. मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा त्रास 365 दिवस देशात सर्वांना सहन करावा लागतो. शिवाय न्यायालयानेही हे भोंगे उतरवालया सांगीतले आहेत. त्यामुळे आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायचा नाही. पण येत्या 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारच, असे सडेतोड उत्तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिकाकारांना दिला आहे.

गुडीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्यावर समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप केला जात होता. त्या सर्व टिकाकारांना आज राज ठाकरे यांनी उत्तरे दिली. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी प्रामुख्याने मशिदीवरील भोंग्यांवर रोखठोक भाष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, प्रत्येकाने आपला धर्म हा आपल्या घरात ठेवावा. मशिदीवरचे भोंगे उतरवणे हा धार्मिक विषय नाही, हा सामाजिक विषय आहे. या भोंग्यांच्या आवाजामुळे सगळ्यांनाच ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो. त्यामुळे हे भोंगें उतरलेच पाहिजे. आता रामजान सुरू आहे. पण येत्या 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारच. आम्हाला समाजात दंगली घडवायच्या नाहीत. त्यामुळे सरकारने सर्व मौलवींशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा.

सुप्रिया सुळे यांच्या घरावर छापा का पडत नाही?

अजित पवार यांच्या घरी छापा पडतो. पण सुप्रिया सुळे यांच्या घरावर छापा का पडत नाही? हे मला कळत नाही. नेत्यांवर छापा पडला तरी पवार -मोदी यांची मैत्री काशी?

पवारांच्या घरी एसटी कर्मचारी जाणार हे तपास यंत्रणेला कळालं नाही

माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार आहे, हे तपास यंत्रणांना कळाले पण  एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरी जाणार हे त्यांना माहित नव्हतं

जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले 

भुजबळांना त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे आत जावं लागलं.  दोन अडीच वर्षे जेल मध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता. जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले

देशात समान नागरी कायदा आणा

देशात समान नागरी कायदा आणा. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा असे नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे. यासाठी देशात  लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading