भाजपचा विजयी निश्चीत पण मताधिक्क घटणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : जेव्हा मताचा आकडा वाढतो त्यावेळी याचा फायदा भाजपला होतो. याचे कारण की भाजपाचा खूप मोठा वर्ग असा आहे की तो मतदानाला जाण्यास कंटाळतो. मात्र या निवडणुकीत मताचा टक्का वाढल्याने भाजपचाच विजयी होणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने मात्र मताधिक्क कमी होईल असेही ते म्हणाले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. काही ठिकाणी झालेल्या वादावादीच्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी ६ नंतर मतदान प्रक्रिया संपताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत या निवडणुकीत भाजपचा विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

यापत्रकार परिषदेस भाजपचे नेते, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महेश जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, या निवडणुकीत प्रशासनावर प्रचंड दबाब होता. सत्ता कशी वापरावी हे या सत्ताधाऱ्यांकडून शिकले पाहिजे. काल पैसे वाटले म्हणून किमान २०-२५ कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा या सत्ताधाऱ्याचा प्लॅन होता. मात्र कोणत्याही केसमध्ये काहीही निष्पण झालेले नाही.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: