रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जबाब नोंदवण्यासाठी भाग पाडल्याचा पीडितेचा आरोप 

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणाला आता एक नवे वळण लागले आहे. या प्रकरणातील पिडीतेने आपल्याला पोलिसात जबाब नोंदवण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाग पाडल्याचा खळबळजनक आरोप आज केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राजकारण केल्याच्या चर्चा होवू लागल्या आहेत.

या पीडितेच्या दाव्यानुसार चित्रा वाघ याच्या सांगण्यावरून तिने हे सगळं केल होत. पिडीत मुलगी म्हणाली, मला सुसाईड नोट लिहण्यास भाग पाडले गेले. तसेच खोटे मेसेज पाठवले गेले. हे मेसेज मी पाठवले नाहीत किंवा त्यानेही पाठवले नाहीत. त्यामुळे मी या सर्वांबाबत पोलिसांना सांगणार असल्याचे पीडितेने आज सांगितले आहे.

कुचीक बलात्कार प्रकरणाचा पुणे पोलीस नव्याने तपास करणार

रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. कुचिक प्रकरणातील पिडीतेचा जबाब पुन्हा नोंदवणार तसच नव्या दाव्याच्या अनुषंगाने तपास करणार असल्याचे  पुण्यातील डीसीपी प्रियांका नारनवरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पिडीत तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. तसेच गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा आरोपही केला होता. या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: