Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

नेतृत्व करण्यासाठी निर्दयी असणे गरजेचे नाही – सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता पुणतांबेकर 

पुणे : नेतृत्व करणे म्हणजे खूप कणखर किंवा निर्दयी असायला हवे असे नाही. महिला या पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात. कारण महिलांमध्ये भावनिकता आणि इतरांची काळजी हे गुण उपजतच असतात. त्यामुळे नेतृत्व करताना त्या अतिशय संयमी असतात आणि इतरांची काळजी घेतात. त्यामुळेच ज्या क्षेत्रात महिलांचे नेतृत्व असते, तिथे त्या यशस्वी असतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या महिला विभागाच्यावतीने राज्याच्या विविध भागातील महिला अध्यक्षांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील महिला नेतृत्वाच्या कार्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील महिला अध्यक्षांचा ‘एम्प्रेस पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र) महिला विभाग प्रमुख डॉ. वैजयंती पटवर्धन, पुणे ग्राहक मंचच्या माजी अध्यक्षा मधुगिता सुखात्मे, डॉ. रवींद्र कुटे, डॉ संतोष कुलकर्णी, आयएमए पुणे चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात भरारी या महिला अध्यक्षांच्या कार्याचा आढावा घेणा-या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. सुहास पिंगळे म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या ६२ वर्षांच्या इतिहासात एकही महिला अध्यक्ष नाही याची खंत वाटते. महिलांनी पुढे लवकरच राज्य पातळीवर नेतृत्व करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात डॉ. गिरीजा वाघ यांचे ॲनिमिया- नवीन दृष्टिकोन, तसेच स्मिता गणेश यांचे बदलते नातेसंबंध व आधुनिक नातेसम्बन्धान्चे समाजिक प्रश्न -या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर ‘भरारी घेताना’ हा परिसंवाद झाला. यामध्ये डॉ. अर्चना कोठारी, डॉ. विद्युत शाह, डॉ. सरिता देशपांडे, डॉ दीपा पावस्कर , डॉ. आशा जाधव, डॉ.उज्वला शिंदे, डॉ. सुरेखा काळे, डॉ.वैजयंती पटवर्धन सहभागी झाले होते. इंडियन मेडिकल असोसियेशन च्या महिला विभाग प्रमुख डॉ वैजयंती पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. माधुरी राऊत; डॉ.माया भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading