शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण : अॅड गुणरत्न सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत वाढ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर शुक्रवारी (दि. 8) करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर एसटी कामगारांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीत आज दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सदावर्ते यांचे वकील म्हणून आज अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला.  

शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट होता, असे सरकारी पक्षाचे वकील अॅड. प्रदीप घरत यांनी न्यायालयात सांगितले. तसेच हल्ल्याच्या वेळी नागपुरातून फोन कॉल येत असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबद अधिक तपास करण्यासाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. 

दरम्यान, तपासात एसटी कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ८० लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. हे कोठून आले? सदावर्तेंच्या व्हॉट्सॲपमध्ये बारामतीचा उल्लेख होता? पत्रकारांना हल्ल्याची वेळ आधीपासूनच माहीत होती का?, असे अनेक प्रश्न आज सरकारी वकिलांकडून उपस्थित करण्यात आले. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: