आदियाल स्पोर्ट क्लब तर्फे भीम बाणा या भीम गीतांच्या महासंग्राम कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथील अमरसिंग आदियाल स्पोर्ट क्लबच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकर जगताप व माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांच्या मार्गदर्शनाखाली भीम बाणा हा भीम गीतांचा महासंग्राम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पिंपळे गुरव येथील भीम चौकात (सृष्टी हॉटेल शेजारी) हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 2008 चा इंडियन आयडॉल विजेते गायक प्रसेनजीत कोसंबी असणार आहेत. शिवाय ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेत्री स्वाती ढोकटे, ‘केसामध्ये गजरा’ फेम अभिनेत्री शीतल चोपडे, पुणे फेस्टिव्हल प्रथम विजेता गायक निशांत गायकवाड आणि प्रसिद्ध निवेदक मुराद काझी आपल्या आगळ्यावेगळ्या ढंगात गाणी सादर करणार आहेत, अशी माहिती अमरसिंग आदियाल स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल यांनी दिली.

 

Leave a Reply

%d bloggers like this: