क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर येतोय हिंदी बायोपिक, प्रतीक गांधी साकारणार मुख्य भूमिका
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजसुधारणेचा घेतलेला वसा अन् त्या काळी सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या चळवळीचा झांजावात आता हिंदीत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 195 वी जयंत्ती या पार्श्वभूमीवर यांच्या जीवनावर आधारीत ‘फुले’ या हिंदी बायोपिकची घोषणा करण्यात आली असून याचा फास्ट लुकही रिलीज करण्यात आला आहे.
‘स्कॅम’ वेबसिरीजच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रतिक गांधी हा या चित्रपटात महात्मा फुले यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री पत्रलेखा ही ‘साऊ’ अर्थात सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपट साकारणारे संवेदनशील दिग्दर्शक अनंत महादेवन हे ‘फुले’ सिनेमाचंही दिग्दर्शन करत आहेत. अभिनेता प्रतीक गांधी याने आपल्या फेसबूक व ट्वीटर आकाऊंटवर याबाबद पोस्ट शेयर केली आहे.
Honoured to take Mahatma Phule’s legacy to the world as an actor along with @Patralekhaa9 in #Phule
On the occasion of 195th birth anniversary of Jyotiba Phule, unveiling the first look of ‘Phule’, the Hindi biopic, directed by @ananthmahadevan pic.twitter.com/cdZwadDaOC
— Pratik Gandhi (@pratikg80) April 11, 2022