Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

बिटकॉईनच्या तपासात सहभागी पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी -हेमंत दवे

पुणे :बिटकॉईन संदर्भात २०१८ मध्ये निगडी व दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र पाटील आणि पंकज घोडे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना सायबर तज्ञ म्हणून मदत करणाऱ्या पाटील आणि घोडे यांनी बिटकॉईन परस्पर त्यांच्या खात्यावर वर्ग करून घेतल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली. मात्र यामध्ये केवळ त्यांचाच समावेश नसून तत्कालीन पोलिस अधिकारी देखील यात सहभागी असण्याची शक्यता असून तपासात सहभागी पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच यासाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी बिटकॉईन गुंतवणूकदारांचे अध्यक्ष हेमंत दवे यांनी पत्रकार परिषदेत केली .

या पत्रकार परिषदेला बिटकॉईन. गुंतवणूकदारांचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी गुंतवणूकदारांच्या वतीने हेमंत दवे आणि निशा रायसोनी यांनी याबाबत माहिती दिली. दवे म्हणाले, ”बिटकॉईन प्रकरणात अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचा सहभाग असून त्यांनी लाखो बिटकॉईनचा अपहार केलेला आहे. भारद्वाज बंधूनी केलेल्या बिटकॉईन चोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर पुण्यासह, कोल्हापूर, मुंबई, नांदेड, ठाणे, नागपूर येथे एकूण १२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर देशभरात ४२ गुन्ह्यांची नोंद आहे. भारद्वाज बंधूनी दहा बिटकॉईनच्या मोबदल्यात १८ बिटकॉईन १८ महिन्यात परत देण्याचा करार करत गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.
या आहेत मागण्या -बिटकान प्रकरणात उच्चस्तरीय तज्ञांची चौकशी समिती नेमण्यात यावी, ब्लॉकचेनमध्ये बिटकॉईनचे ट्रान्झॅक्शन अचूकपणे तपासण्यासाठी चैन अनॅलिसीस सॉफ्टवेअरची मदत घेण्यात यावी.रवींद्र पाटील याने केपीएमजी कंपनी सोबत मिळून एकूण किती बिटकॉईन लंपास केले त्याचा तपास करण्यात येऊन संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा,तसेच पाटील याची मालमत्ता जप्त करण्यात यावी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading