#MeToo प्रकरणानंतर नाना पाटेकरांचं बॉलीवूड मध्ये ‘या’ चित्रपटातून होतंय पुनरागमन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आगामी थ्रिलर चित्रपट ‘द कन्फेशन’ (The Confession) मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. अनंत नारायण महादेवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ‘द कन्फेशन’च्या टीझरनंतर बऱ्याच कालावधीनंतर नाना पाटेकरांचा अभिनय पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. मीटू (#MeToo) प्रकरणानंतर तब्बल चार वर्षानंतर नाना पाटेकर ‘द कन्फेशन’ दमदार पुनरागमन करत आहेत.

तरण आदर्शनं ‘द कन्फेशन’चा छोटासा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये नाना पाटेकरांना आवाज ऐकू येत असून ‘मैंने सच का चेहरा पहले ही देख लिया है, यहाँ तक कि मैंने उसकी आवाज भी सुनी है। हां, मैं सच जानता हूं लेकिन इसे स्वीकार नहीं कर सकता। मैं इसके लिए अपनी जान देने को तैयार हूं’ असं नाना पाटेकर म्हणतं आहेत. या चित्रपटाचे निर्माते नरेंद्र हीरावत, प्रवीण शाह, सगुन बाघ, अजय कपूर आणि सुभाष काळे हे आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध कादंबरीकार आणि पटकथा लेखक सीपी सुरेंद्रन यांनी लिहिला आहे.

चार वर्षानंतर नाना पाटेकरांचा हा पहिलाचा प्रोजेक्ट आहे. यापूर्वी नाना पाटेकर रजनीकांत अभिनित ‘काला’ (2018) चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. ‘हाऊसफुल 4’ (2019) चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावणार होते, त्यांचे शूटिंग सुरू झालं होत. मात्र मीटू दरम्यान तनुश्री दत्तानं त्यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांना चित्रपटातून बाहेर व्हावं लागलं. 2021च्या शेवटी नाना पाटेकर टाटा स्काय जाहिरातीत दिसले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: