‘KGF 2’ चे रेकॉर्डब्रेक अॅडव्हान्स बुकिंग

‘KGF 2’ हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘KGF 2’ चित्रपटाच्या तिकिटांची अॅडव्हान्स विक्री गुरुवारपासून सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी सर्वाधिक आगाऊ बुकिंग केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कालावधीत ‘RRR’ चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने सात कोटी रुपयांची कमाई केली होती, त्याच कालावधीत ‘KGF 2’ चित्रपटाने सुमारे सात कोटी 60 लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून चार दिवस शिल्लक आहेत आणि त्या दिवसापर्यंत चित्रपटाची आगाऊ तिकिटे जवळपास तिप्पट विकली जातील असे मानले जाते.

दिग्दर्शक प्रशांत नीलचा चित्रपट ‘KGF 2’ आतापर्यंत ट्रेंडनुसार कोरोना महामारीनंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या आगाऊ बुकिंगमध्ये अव्वल आहे. अंदाजानुसार, ‘KGF 2’ चित्रपटाची आगाऊ बुकिंग शुक्रवारपर्यंत 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. निर्माता विजय किरुगांडूर आणि कार्तिक गौडा यांच्या KGF 2 चित्रपटात कन्नड अभिनेते यश, श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अभिनेता प्रकाश राज यांची खास भूमिका आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: