JNU मध्ये ABVPचा राडा, विद्यार्थिनींनाही केली मारहाण
नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) मध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी आणि ABVP यांच्यात वाद झाला आहे. आज रविवारी नॉनव्हेज खाण्यावरून हा वाद झाला. समाजमाध्यमांमध्ये या संबंधित फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावेळी मारामारी झाली असून यावेळी ABVPच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींनाही केली मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज रामनवमी या पार्श्वभूमीवर JNU परिसरातील कावेरी हॉस्टेलमध्ये दुपारी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय आज रविवार असल्याने अनेकांच्या मेसच्या जेवणात नॉनव्हेज असणार हे होते. हे ABVP च्या कार्यकर्त्यांना काळाल्यावर त्यांनी मेसवर जाऊन राडा केला. यावेळी झालेल्या भांडणात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुलींचा समावेश आहे.
जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष एन. साई बालाजी यांनी दावा केला आहे की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यापासून रोखले आहे. साई बाला म्हणाल्या की, नवरात्रीत विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखण्यात आले होते. अभाविपने विद्यार्थ्यांना मेसमध्ये नॉनव्हेज खाण्यापासून रोखल्याचा व्हिडीओ त्यांनी जारी केला आहे. त्याचवेळी अभाविपने अशा आरोपांचे खंडन केले आहे.
कार्यकर्त्या कविता कृष्णन यांनी ट्विट केले की, “JNU मध्ये ABVP ने वसतिगृहाच्या मेसमध्ये मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुन्हा वाईट हल्ला केला आहे. यामध्ये दोन मुलींसाह जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष एन. साई बालाजी हे जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकारावेळी पोलिस उपस्थित होते. मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही.
Note that these are pictures of the injured – NOT pics of the attack; the men in the pics are themselves victims not the attackers https://t.co/fnFLtYpZ2m
— Kavita Krishnan (@kavita_krishnan) April 10, 2022