महाविकासआघाडी सरकार आमच्या कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखल करतेय – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :कोल्हापूर मधील मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उत्तर मतदारसंघ पोट निवडणूक उद्या वर आली आहे . त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे.पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे महाविकासआघाडी मधील नेते आमच्या कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखल करून  अडकवतायत. असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महा विकास आघाडी सरकारवर केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे कोल्हापूर मध्ये विकास आघाडी सरकार मधल्या मंत्र्यांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या जेवण्याची व्यवस्था करणाऱ्या कार्यकर्त्यावर थेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी महा आघाडी सरकारवर केला.
महा विकास आघाडी कोल्हापूर मधल्या नेत्यांनी किती आमच्यावर आरोप व गुन्हे दाखल केले तरी
आमचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत. अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत नेतील, याची मला खात्री आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: