ABVP – राज्यस्तरीय प्रवेश परिक्षा परिषद संपन्न
पुणे : शंकर राव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित “राज्य स्तरीय सामायिक प्रवेश प्रकिया परिषद” पार पडली. यामध्ये सामायिक प्रवेश प्रक्रियेतील होणारी दिरंगाई आणि अडचणी याबद्दल चर्चा करण्यात आली.
अभियांत्रिकी, औषधविज्ञान, वास्तूकला, हॉटेल मॅनेजमेंट, MBA, MCA, विधी, शिक्षणशास्त्र, कृषि आणि शारीरिक शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या ४,४१,९३८ एवढी असून या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परिक्षा प्रवेश होण्यापर्यंत विविध तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागते. याच हेतूने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्राच्या वत्तीने “राज्यस्तरीय सामायिक प्रवेश प्रकिया परिषदेचे” आयोजन केले होते.
परिषदेची प्रस्तावना अभाविपचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी यांनी केली. यावेळी अभाविपने CET सेलला वारंवार निवेदन दिली आहे, सुधारणा करण्यासाठी सूचना केल्या आहे, तसेच RTI च्या माध्यमातून माहिती मागवली आहे व विद्यार्थ्यांना अधिक सुलभ प्रक्रिया कशाप्रकारे होईल यासाठी अभाविप प्रयत्न करत आहे असे मत व्यक्त केले .
यामध्ये विविध शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्या मान्यवरांनी आपली मते मांडली व अपेक्षित मार्गदर्शक सूचना देखील दिल्या.
डॉ.पराग काळकर (अधिष्ठाता,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी आपले मत व्यक्त करताना बोले की खाजगी विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकर होतात व शासकीय विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होते त्यामुळे हे कोणाच्या भल्यासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होतो. लोक सेवा आयोगाची परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा सोबत आल्या कारणाने परीक्षा वेळापत्रक बद्दलावे लागते, बोर्ड (HSC) परीक्षेचे निकाल वेळेत न लागल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई होते. प्रवेश प्रक्रियेत होणार्या दिरंगाई मुळे मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढते आहे.
डॉ. मुकुंद कुलकर्णी (अधिष्ठाता विश्वकर्मा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सर्व प्रवेश प्रक्रिया केंद्रिय प्रणाली नुसार प्रवेश प्रक्रिया घ्यावी. दोन वर्षाच्या MBA पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ९ महिन्याचा कालावधी का लागतो? हे हास्यास्पद आहे. त्यामुळे CET सेल वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रा. गजेंद्र ढमाले म्हणाले की विधी प्रवेश प्रक्रियेत सहजता व सुलभता यावी यासाठी कागदपत्रांची मर्यादा कमी करावी. विधीच्या तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना १० वी, १२ वी च्या कोणत्याही कागदपत्रांची अनिवार्यता नसावी.
