MNS : अखेर राज – वसंत शिवतीर्थावर भेटणार

पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि गुढीपाडव्याला मंदिरातील भोग्या वरील आवाज कमी करायचा असा आदेश दिला होता त्यावर मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आणि मी माझ्या प्रभागात तसे काही होऊ देणार नाही असे वक्तव्य केले होते त्यावर वसंत मोरे यांची काही दिवसापुर्वी पुणे शहर अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी साईनाथ बाबर यांच्या खांद्यावरती अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, रासप यांनी मोर यांना पक्ष प्रवेशासाठी ऑफर्स दिल्या आहेत, तसेच मनसेच्या काही पदाढीकाऱ्यांनी राजीनामे दिले  या सर्व राजकीय नाराजी, नाट्यमय घडामोडी नंतर अखेर राज  ठाकरे यांनी वसंत मोरे यांना भेटीचे निमंत्रण दिले ठाकरे यांच्या  ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी त्यांची भेट होणार आहे. 

वसंत मोरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेत येण्याची पण ऑफर आली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पण राष्ट्रवादीत  येण्याची ऑफर घातली होती. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु खुद्द वसंत मोरे यांनीच या चर्चेला ब्रेक लागला. आता समोर आलेल्या माहितीवरुन वसंत मोरे यांना राज ठाकरेंचा निरोप आला आहे. सोमवारी सकाळी मुंबईला बोलावले आहे. वसंत मोरे सोमवारी सकाळी शिवतीर्थवर जाणार आहेत.
पुण्यातील एक विश्वासू सहकारी म्हणून राज ठाकरे वसंत मोरेंकडे पाहतात. त्यांच्या पक्षातून जाण्याने पक्षाला फार मोठी हानी होऊ शकते. म्हणून आता राज ठाकरेंनी वसंत मोरेंना भेटण्यासाठी बोलावले आहे. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठी करण्यात वसंत मोरेंचा फार मोठा हात आहे. या सर्व नाट्यानंतर मोरेंना जवळपास सर्वच पक्षातून आमच्या पक्षात या म्हणून ऑफर होती.
मी राज साहेबांचाच म्हणत त्यांनी मनसेत राहण्याचे ठरवले. आगामी काळात महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत त्यामुळे मनसे पुण्यात मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी करत आहे. राज ठाकरेंचे पुणे दौरे वाढत आहेत. त्यामुळे वसंत मोरे पक्षात असणे फार महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: