आंदोलनाच्या निमित्ताने दिसले राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘देशी दारू’ प्रेम

पुणे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वी मॉल, किराणा स्टोअर्स मध्ये वाईन विकण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध केल्यानंतर सरकारने निर्णय तात्पुरता लांबवला. रविवारी पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकार किराणा दुकानात वाईन विक्री करणार नाही म्हणून काय झाले” आमचे तर ‘देशी दारू’वर प्रेम असल्याचे दाखवत एका उच्चशिक्षित वकिलाच्या विरोधात आंदोलन करताना चक्क देशी दारूचा त्या वकिलाच्या फोटोला अभिषेक घातला. आंदोलन, निषेध व्यक्त करावा मात्र कोणत्या मार्गाने? यांचे भान राष्ट्रवादीच्या आमदारांना आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला होता.  या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहे. रविवारी पुण्यात वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.  यावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, माजी नगरसेविका उषा कळमकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार सुनील टिंगरे म्हणाले, आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या घरावर परवा काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. खरंतर एसटी कर्मचाऱ्याचे प्रश्न सुटले असले तरी हा हल्ला करण्यात आला.  शरद पवारांची  काही चूक नसताना हा हल्ला  करण्यात आला. याचा निषेध म्हणून आज आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचि बाजू न्यायालयात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या फोटोला देशी दारूने अंघोळ घालून निषेध व्यक्त करत आहोत. 

Leave a Reply

%d bloggers like this: