Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

वंचित बहुजन आघाडीची वसंत मोरे यांना ऑफर

पुणे : भोंग्यांच्या मुद्द्यावरून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहरप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर मोरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि आज वंचित बहुजन आघाडी ने
पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वसंत मोरे यांची भेट घेऊन. त्यांना वंचित बहुजन आघाडीची भूमिका अॅड. प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका समजावून सांगत समता स्वातंत्रता व बंधुता या मूल्यांचे जतन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी मध्ये येण्याचं निमंत्रित केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील, विशाल गवळी, पुणे शहर महासचिव जितेंद्र जाधव, महेश कांबळे, वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष विवेक लोंढे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading