स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास प्रादेशिक उपआयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे लेखाधिकारी नंदकुमार कुलकर्णी लेखाधिकारी प्रभाकर घोटे, विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे आदी उपस्थित होते.
कुलकर्णी यांनी कार्यालयाच्यावतीने परिसरातील अशिक्षित, वृद्ध, दिव्यांग आणि योजनांच्या लाभा पासून वंचित लोकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याचे आवाहन केले. हरसुरे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय व विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार इतर योजनांचा लाभ घेवून आपली शैक्षणिक प्रगती करण्याचे आवाहन केले.
यावेळी योजनांविषयीच्या माहितीपत्रीकेचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोगतातून स्वाधार योजनेमुळे शिक्षण घेण्यासाठी सुविधा झाल्याची भावना व्यक्त केली.