Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आणि जनजागृती शिबिर

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या मेळाव्यास सहायक आयुक्त संगिता डावखर, ज्येष्ठ नागरिक समन्वय आणि संनियंत्रण समितीचे सदस्य अरुण रोडे, चंद्रकांत महामुनी, हेल्पेज इंडियाचे राजीव कुलकर्णी, रेखा आनंद, अमित दांगट आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. नारनवरे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना विविध विभागांच्या येाजनांचा एकत्रितरित्या लाभ देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. महाविद्यालयातून ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारा विषयी जागृती निर्माण केल्यास तरुण पिढीत ज्येष्ठ नागरिकांविषयी आदराची भावना निर्माण होईल. ज्येष्ठ नागरिकांच्या योजना व अधिकाराबाबत राज्यातील अधिकाऱ्यांसाठी परिसंवादाचे आयोजन करावे आणि ज्येष्ठ नागरिक धोरणाची मार्गदर्शिका तयार करावी, असे त्यांनी सांगितले. समाज कल्याण विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी दिली.

रोडे यांनी ज्येष्ठ नागरिक धोरण आणि आनंद यांनी ज्येष्ठ नागरिकांची राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ विषयी माहिती दिली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना क्षेत्रीय पातळीवर मदत, मार्गदर्शन व माहिती देण्याचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या ‍निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि आवश्यकतेनुसार प्राथमिक औषधेही मोफत देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading