fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

रस्त्याचे काम पूर्ण होऊनही कृष्णा चौक ते काटेपुरम चौकादरम्यान अनेक महिन्यांपासून पदपथाचे काम अपूर्णावस्थेत

ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी

पिंपरी : नवी सांगवीतील कृष्णा चौकातून काटेपुरम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन अनेक महिने होऊन गेले. मात्र, ठेकेदाराने एका बाजूच्या पदपथाचे काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठमोठ्या दगडांचे अडथळे पार करीत वाट काढावी लागत आहे. या ठिकाणच्या पदपथाचे काम लवकरात लवकर पूर्ण मागणी, तसेच संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की स्मार्ट सिटी अंतर्गत कामे होत असताना त्या कामांच्या दर्जाकडे लक्ष दिले गेले नाहीच. शिवाय अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत कामे सोडून देण्यात आली आहेत. नवी सांगवीतील कृष्णा चौकाकडून काटेपुरम चौकाकडे जाताना पदपथाचे काम अपूर्णावस्थेत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कायमस्वरूपी गर्दीच्या रस्त्यावरून ये जा कारण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पदपथ, सायकल ट्रॅक, अंधांसाठीचा ट्रॅक नियोजित असतानाही काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांसाठी ही जागा पार्किंगचे ठिकाण झाले आहे.

रस्त्यावरील भरधाव वाहनांच्या भीतीने नागरिक या दगड, राडारोडा असलेल्या पदपथावरून जातात. मात्र, मोठ्या दगडामुळे ठेचकळून पडण्याचीच जास्त शक्यता असते. तरीही नाईलाजास्तव नागरिकांना या पदपथाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणचे अपूर्णावस्थेत सोडून दिलेले काम पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका 

“भाजपच्या तत्कालीन नगरसेवकांनी या कामाकडे राजकीय हेतूने लक्षच दिले नसल्याने ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवले. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे काम अपूर्ण ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर महापालिका आयुक्त व स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी. तसेच संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे.”

– राजेंद्र जगताप (माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading