Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शरद पवार, अजित पवार अन् वळसे-पाटलांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका; गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा गंभीर आरोप

मुंबई : एसटी कामगारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली गेली. रात्री कोणतीही नोटीस न देता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना तात्काळ अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “शरद पवार, अजित पवार अन् वळसे-पाटलांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका” असा आरोप त्यांनी केला आहे. 

प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत अतिरेकी असल्यासारखं घरातून घेऊन आले. कोणतीही माहिती न देता त्यांना अटक करण्यात आली आहे. ही शरद पवार यांचं षडयंत्र आहे. ते ताकदीचा चुकीचा वापर करत आहेत. दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि दिलीप वळसे – पाटील यांच्याकडून ही खेळी केली जात आहे.  

पुढे जयश्री पाटील म्हणाल्या, ”आम्ही पवार कुटुंबीयांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यामुळे आमच्यावर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई करण्यात आलीय. पण शरद पवार हा टेरर चालणार नाही. तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली तशीच पवारांवर होईल,” असा इशारा जयश्री पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading