राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा मुळे माझ्या मनाला अनंत वेदना – वसंत मोरे

पुणे : पुण्याच्या कोंढवा परिसरात काल मनसे वसंत मोरे समर्थक मुस्लीम समाजबांधवांनी एक मोर्चा काढला होता. या मोर्चात राज ठाकरे आणि साईनाथ बाबर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली. त्यामुळे आता मनसेच्या गोटात पुन्हा तणाव निर्माण झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना वसंत मोर म्हणाले की, “मुस्लीम बांधवांनी समाजात दुफळी माजणार नाही आणि वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी माझी विनंती आहे. ज्यासाठी केला होता मी अट्टाहास तो दिवस सुखाचा व्हावा या वाक्याप्रमाणे आपण सर्वांनी वागावं. सर्वांना हात जोडून विनंती आहे .राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट घोषणा देऊ नका यामुळे माझ्या मनाला अनंत वेदना होतात.”

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवर भोंग्यांसदर्भात वक्तव्य केलं. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी फारकत केल्यामुळे पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत. वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून काढून टाकल्यानंतर ते मनसेतून बाहेर पडणार की पक्षात राहणार? अशी चर्चा सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे पुण्यातील वसंत मोरे यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याचे ऑफर दिली आहे. त्यावर वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, 2 तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणानंतर मी माझी भूमिका मांडली. मला कायम वाटत होत की माझा भाग शांत असावा. परंतु मी जे बोललो. माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमातून विपर्यास करण्यात आला. तसेच त्यातून मी राजसाहेबांच्या भूमिकेला विरोध केला, असा प्रचार करण्यात आला. काल कोंढवा परिसरात मुस्लिम बांधवांनी एका मोर्चेच आयोजन केलं होत, त्यात मी ऐकलं, ते ऐकून मला वेदना झाल्या. मोर्च्यात राज ठाकरे, साईनाथ बाबर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्या घोषणा ऐकून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आहेत. राजसाहेब हे जिंदाबाद होते आणि साहेब कायम जिंदाबाद राहतील.अशी मला पूर्ण खात्री आहे.असे वसंत मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: