Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

या हल्ल्यात एसटी कर्मचाऱ्यांचा हात नसून एखाद्या मोठ्या माणसाचा याला पाठिंबा – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार  यांच्या मुंबईमधील निवासस्थानी बाहेर संपकरी एसटी कामगारांनी गोंधळ घातला आहे. एसटी कामगारांनी  शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी घुसून चप्पल फेक देखील केली. त्यामुळे हा एसटी कामगारांचा वाद आता थेट शरद पवार यांच्या घरापर्यंत पोचला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक सुद्धा झाली आहे. त्यावर “या आंदोलकांचा हेतू पवार साहेबांना इजा पोहचवणे व त्रास देणे असावा. या हल्ल्यात एसटी कर्मचाऱ्यांचा हात नसून कुठल्यातरी मोठ्या माणसाचा ह्याला पाठिंबा आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या व विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. 

डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, सुप्रीम कोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांबाबत जो निकाल दिला तो एसटी कर्मचाऱ्यांना धुडकावून लावायचा होता म्हणून त्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. जो हल्ला काल झाला तो उद्या पण होऊ शकतो. तसेच इतरांवर पण होऊ शकतो, यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला त्यामुळे पोलिसांनी शरद पवार यांना सिक्युरिटी दिले पाहिजे. Attempt to murder अंतर्गत पोलिस कारवाई करतील का ?असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांपुढे उपस्थित केला. 

दरम्यान, आज अजित पवार व देवेंद्र फडणीस यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पोलिसांवर जे आरोप केले जातात. त्यामुळे पोलिसांचे खच्चीकरण झाले आहे. पोलीस हे अधिक सक्षम बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading