महाराष्ट्र राज्य 17 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरच्या कशित नागराळेचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय  

नाशिक : नाशिक जिल्हा लॉन टेनिस संघटना(एनडीटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्याच फेरीत नागपूरच्या कशित नागराळे याने अमरावतीच्या चौथ्या मानांकित कुशल बात्राचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
 
एनआयडब्लूइसी टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात साताराच्या पाचव्या मानांकित ओंकार शिंदे व नागपूरच्या तेजल पाल यांनी अनुक्रमे सोलापूरच्या प्रसन्न पांडेकर व अकोल्याच्या पार्थ ठाकरेचा 4-0, 4-1 अशा सारख्याच फरकाने पराभव केला.
मुलींच्या गटात पाचव्या मानांकित पुण्याच्या रिया भोसले हिने आठव्या मानांकित साताऱ्याच्या वेदिका माळीचा 4-0, 4-1 असा तर, सहाव्या मानांकित पुण्याच्या रमा शहापूरकरने नाशिकच्या भावना सुंदरारामाचा टायब्रेकमध्ये 4-1, 5-3(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेचे उदघाटन नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देशपांडे, एनआयडब्लूइसी क्लबच्या टेनिस विभागाचे अध्यक्ष श्रीकांत कुमावत, जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील, एमएसएलटीएच्या सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:17 वर्षांखालील मुले:
कशित नागराळे(नागपूर)वि.वि.कुशल बात्रा(अमरावती)[4] 4-0, 4-0;
ओंकार शिंदे(सातारा)[5] वि.वि.प्रसन्न पांडेकर(सोलापूर)4-0, 4-1; 
लक्ष्य गुजराथी(येवला)[6] वि.वि.कर्तव्य कारंडे(नांदेड)[7] 4-0, 4-0;
तेजल पाल(नागपूर)वि.वि.पार्थ ठाकरे(अकोला)4-0, 4-1; 
सार्थक पोद्दार(परभणी)[8] वि.वि.अनुश घनबहादूर(नाशिक)4-2, 4-2;
17वर्षांखालील मुली:
रमा शहापूरकर(पुणे)[6] वि.वि.भावना सुंदरारामा(नाशिक)4-1, 5-3(5);
रिया भोसले(पुणे)[5]वि.वि.वेदिका माळी(सातारा)[8] 4-0, 4-1;

Leave a Reply

%d bloggers like this: