गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा

पुणे : ‘संगीत आणि लय हे तुमच्या आत्म्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग स्वत:च शोधतात’, या उक्तीचा अर्थ अतिशय योग्यप्रकारे स्पष्ट करू शकणारे व्यक्तीमत्व म्हणजे गायिका किशोरी आमोणकर. कारण, त्यांची ओळख मुळातच परिपूर्ण व्यक्तीमत्व अशी आहे. परिपूर्ण आणि अतिशय प्रभावी गायनाच्या सादरीकरणातून ‘गानसरस्वती’ अशी ओळख निर्माण केलेल्या गायिका किशोरी आमोणकर यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त गायन आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

गायिका किशोरी अमोणकर (१० एप्रिल १९३२ ते ३ एप्रिल २०१७) या ज्येष्ठ हिंदूस्थानी शास्रीय गायिका होत्या. जयपूर घराण्याच्या गायिका असलेल्या किशोरी आमोणकर यांनी ‘ख्याल’, ठुमरी आणि भजन या प्रकारातील गायनात प्रावीण्य मिळविले होते. त्यांनी त्यांच्या आई आणि जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडून शास्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतले, मात्र त्यानंतरच्या काळात त्यांनी आपल्या गायनशैलीत विविध प्रयोग केले. आपल्या आवाजातील जादूने गानसरस्वती किशोरी अमोणकर यांनी लाखो लोकांवर आपल्या गायनाची भूरळ टाकली होती. त्यांचे गायन ऐकण्यासाठी दूरवरून लोक येत आणि अतिशय संयमितपणे तासनतास वाट पाहत असत.

गायिका किशोरी अमोणकर यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील लेखक रिदम वाघोलीकर आणि गायिका तेजश्री आमोणकर (किशोरी आमोणकर यांच्या नात) यांनी त्यांच्या ‘द सोल स्टिरिंग व्हॉइस- गानसरस्वती किशोरी अमोणकर या पुस्तकातील अमोणकर यांच्याबद्द्लच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

याबाबत तेजश्री अमोणकर म्हणाल्या,” किशोरी ताई या संगीताचे मूर्त रुप होत्या. संगीत हेच त्यांचे जीवन होते आणि त्यांचे जीवन हे संगीताभोवतीच फिरत हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्या शिष्यांकडूनही त्या हीच अपेक्षा ठेवत. संगीताव्यतिरिक्त किशोरीताई नेमक्या कशा होत्या, हे अगदी मोजक्या लोकांनाच माहिती होते. त्या एखाद्या स्फटिकाप्रमाणे स्पष्ट होत्या, त्यांच्या विचार आणि आचारणातही पारदर्शकता होती. त्या आपल्या रागांच्या ‘नोट्स’ इतक्या आपुलकीने जपत असत, जसे की एखादे लहान मूल आपल्या आवडीची वस्तू हिरावून जाण्याच्या भीतीने तिला अगदी काळजीपूर्वक जपते. त्यांची तळमळ त्यांचा कृतीतून व्यक्त होत असत. एक गुरू म्हणून त्यांचा यावर विश्वास होता, जी जे त्या करू शकतात, ते इतर कोणीही करू शकतो. त्यांनी कोणत्याही शिष्यांना त्यांची क्षमता पाहून शिकवण दिली नाही, तर प्रत्येक शिष्यामध्ये संगीत शिकण्याची क्षमता असते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांची शिकवण केवळ मलाच नव्हे, तर त्यांचे सर्व शिष्य, हिंदुस्थानी शास्रीय संगीताचे शिष्य यांना एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी आहे. मंचावरील गायक आणि संगीतकार यांना किशोरीताईंनी आदराचे स्थान मिळवून दिले.
किशोरीताईंकडील माझे संगीताचे धडे हे पूर्णत: गुरु आणि शिष्य या नात्यावर आधारित होते, पण त्या पलीकडेही माझ्यासाठी त्या माझ्या प्रेमळ आजी होत्या, ज्या आपल्या नातीसाठी काहीही करायला नेहमीच तयार असत. आम्ही एकमेकींच्या अतिशय जवळ होतो. कधी-कधी एकमेकांशी तत्त्वज्ञान आणि धर्मावर चर्चाही केली. पौराणिक कथा किंवा कर्मकांडाच्या पद्धतींबद्दल आमच्यामध्ये काही मतभेद होते, परंतु त्यांच्याशी त्याबद्दल बोलताना मला कधीही भीती किंवा अस्वस्थता वाटली नाही. वयात तफावत असूनही आम्हा दोघींचे अतिशय चांगले जमत असत आणि एक अतिशय आनंदी नाते आम्ही अनुभवले.

रिदम वाघोलीकर म्हणतात, ” किशोरी आमोणकर यांची प्रत्येक
कथा ही मुख्यत्वे त्यांच्या उद्धट स्वभावाभोवती फिरत असते. पण जेव्हा मी त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी आणि कुटुंबीयांशी बोललो तेव्हा ही एक अफवा असल्याचे जाणवले आणि त्यावेळी हे लक्षात येते की ‘शास्त्रीय संगीत ही एक कला आहे, ज्यामध्ये संवादाचा समावेश होतो. स्वतःशी संवाद साधणे, संगीताचे नोट्स बरोबर घेणे म्हणजे बोटाच्या टोकावर संगीताच्या रागाचा समतोल साधण्यासारखे आहे आणि यात चिकाटी, समर्पण आणि एकाग्रता यांची आवश्यकता असते. किशोरी आमोणकर यांचे ‘उदात्त विलगीकरण’ हे अनेकदा त्यांचा अहंकार समजले गेले. ही एक चुकीची धारणा आहे. “

ते पुढे म्हणाले, “मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेकांनी चिंतातूर झालेल्या मनाला शांत करणारे संगीत ऐकले असेल, पण अनेकांना या वस्तुस्थितीची जाणीव नाही की संगीतातही तुम्हाला अमूर्त प्रवासात नेण्याची ताकद आहे. हे मला किशोरी आमोणकरांच्या संगीतात जाणवते. त्यांचा संगीत सिद्धांत आणि नोट्सची समज खरोखरच अदभूत होती जी आत्म्याच्या अंतर्भागातील गडद कोपऱ्यांना प्रकाश देण्यास सक्षम होती. जेव्हा तुम्ही त्यांची ‘पग घुंगरू बांधे मीरा’ किंवा ‘अवघा रंगा एक झाला’ ही गाणी ऐकता तेव्हा अमूर्ततेची जाणीव होते आणि संगीतामध्ये भावनांवर भर देण्याचे महत्त्व लक्षात येते. कदाचित याच कारणामुळे त्यांचे गायन ऐकताना नेहमीच श्रोत्यांचे अश्रू अनावर झाले आणि त्यांना अमूर्ताचा अनुभव मिळाला. मला सर्वात जास्त कुतूहुल वाटले, ती गोष्ट म्हणजे, जवळजवळ सात दशकांहून अधिक काळ संगीतासाठी समर्पित केल्यानंतरही त्यांच्यामध्ये सतत शिकण्याची ओढ होती. एखादा राग वेगवेगळ्या प्रकारे सादर करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती, प्रत्येक वेळी त्यांनी मंचावर प्रवेश केला, की तो अनुभव अथांग होता. त्यांचे जीवन एक कॅनव्हास होते ज्याने त्यांच्या संगीताच्या विविध छटा दाखवल्या होत्या. मला वाटते की यामागे अनेक कारणे आहेत, ज्यांनी मला किशोरी अमोणकर या आख्यायिकेच्या निर्मितीचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.”

Leave a Reply

%d bloggers like this: