हरित स्रोत ऊर्जेच्या वापरासाठी एटीयूएम चार्ज तर्फे महाराष्ट्रात ३६ सौर उर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग स्टेशनची निर्मिती
पुणे : वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. देशात पहिल्यांदाच १०० टक्के ग्रीन सेल्फ-सस्टेनिंग असलेले सौर-उर्जेवर चालणारे एटीयूएम चार्जने देशभरात २५० युनिव्हर्सल ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी केली आहे . महाराष्ट्रात ३६ चार्जिंग स्टेशन ची सुरुवात केली आहे . विशेष बाब म्हणजे सर्व चार्जिंग स्टेशन हि फक्त गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत उभारण्यात आली आहेत. कंपनीने सध्या ४ केव्ही क्षमतेचे पॅनेल स्टेशनवर लावले आहेत. जे दररोज १० ते १२दुचाकी , तीनचाकी तसेच चार चाकी वाहने चार्ज करू शकतात. आज कोणतीही ईव्ही पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान ६ ते ८ तासांचा कालावधी लागतो . भविष्यात कंपनी अतिरिक्त ६ केव्ही क्षमतेची स्थापना करणार आहे ज्यामुळे दररोज २५ ते ३० वाहने चार्ज करता येवू शकतात .एटीयूएम चार्ज ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे मुख्य उद्दिष्ट हे पर्यावरणास अनुकूल आणि टिकाऊ इको-सिस्टम तयार करणे आहे .
एटीयूएम चार्ज हे एक प्रकारचे ईव्ही चार्जिंग स्टेशन असून हे जगातील पहिले वीज निर्माण करणारे इंटिग्रेटेड सोलर छत आहे. हे संपूर्ण इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी १०० टक्के सौरचा वापर करते. तर पारंपारिक ईव्ही चार्जिंग स्टेशन थर्मल पॉवर वापरून वीज निर्माण करतात. यामुळे पॉवर ग्रिडवर अतिरिक्त ताण पडतो. ज्यामुळे देशातील वीज संकट अधिक वाढू शकते. ईव्ही उत्पादन आणि विक्रीमध्ये सतत वाढ झाल्याने औष्णिक उर्जेसारख्या पारंपारिक उर्जेवरील भार देखील वाढला आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी एटीयूएम सोलर रूफद्वारे समर्थित एटीयूएम चार्ज हा बाजारातील सर्वोत्तम उपाय बनला आहे. एटीयूएम चार्ज आवश्यक तिथे वीज पुरवेल आणि ही प्रक्रिया विकेंद्रित असल्यामुळे ग्रिडवर त्याचा निचरा कमी होत आहे.
एटीयूएम चार्ज हे इतर विविध चार्जिंग स्टेशन मालकांसोबत भागीदारी करत आहे. जेणेकरून त्यांना एटीयूएम सोलर रूफचा पुरवठा केला जाईल आणि त्याद्वारे अत्यंत प्रदूषित औष्णिक उर्जा स्त्रोताऐवजी हरित उर्जा स्त्रोत वापरण्यास सुरुवात होईल. टायर १ आणि टियर २ शहरांवर लक्ष केंद्रित करून आणखी काही शहरे आणि राज्यांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. या स्टेशनच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वाहतूक पद्धतींचा अवलंब करण्यास सक्षम करत आहे.