प्राचीन आणि आधुनिक भारताच्या वास्तूकलेचे विविध पैलू उलगडणारे ‘अभि-वास्तु’ प्रदर्शन

पुणे : मलेशियामधील ट्विन टॉवर, आसाम मधील माजुली आयलँड येथील नैसर्गिक गोष्टी वापरून तयार केलेले काल्पनिक टुरिस्ट सेंटर, शांघाई टॉवर…पुण्यातील मेट्रो यांसह राजस्थान..पाॅंडीचेरी या राज्यातील संस्कृती – इतिहास अभ्यासून साकारलेल्या वास्तू…. बहामनी साम्राज्यातील वास्तूकला.. इजिप्तमधील मंदिरे आणि मशिदी तसेच इस्लामिक, हिंदू, जैन वास्तूकला यांच्यातील बारकावे पाहण्याची संधी पुणेकरांना ‘अभि वास्तु’ या वास्तुकला प्रदर्शनात मिळाली.

श्री शिवाजी मराठा सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने वास्तुकला प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाच्या अरण्येश्वर कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र पुणेच्या संचालिका जयश्री देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे माजी अध्यक्ष प्रकाश देशमुख, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सचिव अण्णा थोरात, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी चेअरमन डॉ.नितीन पवार, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, सत्येंद्र कांचन, पद्माकर पवार, प्राचार्य चंद्रकांत कटारिया उपस्थित होते.

संस्कृती, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून शहरांचा विकास कसा होत गेला आणि त्यातून वास्तूकला कशी निर्माण झाली, हे विद्यार्थ्यांनी निरीक्षणातून मांडले आहे. प्रदर्शनामध्ये नदीवर वसलेल्या लवासा शहराचे चांगले आणि वाईट परिणाम… पुण्यातील रस्त्यांवर उत्सवाचा होणारा परिणाम याचा अभ्यास करुन विविध प्रतिकृती विद्यार्थ्यांनी अतिशय बारकाईने साकारल्या आहेत. याशिवाय जैन वास्तुकलेतून साकारलेले जैन मंदिरे, वैदिक वास्तूकला, ग्रीक, गॉथिक स्थापत्यकला यांची अतिशय सुरेख रेखाटने विद्यार्थ्यांनी रेखाटली आहेत. सोमवार दिनांक ११ एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते ५ यावेळेत अरण्येश्वर कॅम्पसमध्ये प्रदर्शन विनामूल्य पाहण्यास खुले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: