fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

धक्कादायक : पुण्यात सार्वजनिक शौचालयात भरदिवसा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात काल शुक्रवारी (8 एप्रिल) ही घटना घडली. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरात राहण्यास. शुक्रवारी दुपारी ही मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता सदर आरोपी हा तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला. अन् तेथे आरोपीने त्या मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस पुढील तपास करीत आहे.

दरम्यान, या घटनेची दखल घेत रूपाली चाकणकर यांनी या घटनेबाबत ट्वीट करीत आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तर भाजप नेत्या चित्रावाघ यांनी संबंधीत घटनेवर ट्वीट करीत सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading