डाॅ. अजय दुधाणे यांची पुणे जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड

पुणे : आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डाॅ. अजय दुधाणे यांची भारत संचार निगम लिमिटेडच्या पुणे  जिल्ह्याच्या टेलिफोन सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भारत संचार निगम लिमिटेडचे सेल्स आणि मार्केटिंगचे उपमहाप्रबंधक एस.पी. सोनावणे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

डॉ. दुधाणे यांना आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल अनेकवेळा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. दुधाणे गेल्या १८ वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, चंदननगरची स्थापना केली. सध्या सासवड, कोल्हापूर, बारामती, सांगली, मुंबई, ठाणे, भुसावळ, नांदेड, रत्नागिरी, चिपळूण येथे संस्थेची पाठपुरावा केंद्र सुरु आहेत. महाराष्ट्रातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र पुण्यात त्यांच्या पुढाकाराने सुरु झाले आहे.

सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. दुधाणे यांना २०१० चा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा समाजगौरव पुरस्कार, २०११ चा महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती संचलनालयाचा पुरस्कार, २०१३ चा महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, २०१५ चा इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार, राष्ट्रगौरव पुरस्कार, मणिभाई देसाई पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांची २०१६ मध्ये राष्ट्रीय व्यसनमुक्ती सल्लागार समितीमध्ये महाराष्ट्रातून एकमेव निवड करण्यात आली आहे. तसेच नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल लिडर्स फाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. दुधाणे यांना स्पिरीट आॅफ ह्युमॅनिटी पुरस्कार २०१७ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मागील २० वर्षापासून सामाजिक क्षेत्रात डाॅ.अजय दुधाणे कार्यरत आहेत व भाजप एनजीओ आघाडीचे शहर अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय नवी दिल्लीचे राष्ट्रीय सल्लागार व एन जी ओ फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून देखील ते काम पाहतात. अटल अभुदय  योजनेचे महाराष्ट्रातील  सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: