MNS – वसंत मोरे पक्षाच्या सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

पुणे: मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता.
त्यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यावर ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे मत व्यक्त केले. प्रभागातील काही मुस्लीम मतदारांनी ते भयग्रस्त झाले असल्याचेही आपणाला सांगितले. एका शाखाप्रमुखाने राजीनामा दिला. असेही मोरे यांनी जाहीर केले.
राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर (लेफ्ट) पडल्याची माहिती समोर येत आहे. उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून वसंत मोरे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: