संयुक्त स्त्री संस्थेच्या अध्यक्षपदी नीता रजपूत यांची निवड

पुणे : संयुक्त स्त्री संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीमती नीता रजपूत यांची फेरनिवड झाली . संयुक्त स्त्री संस्थेचे हे ६१ वे वर्ष आहे.संस्थेच्या शारदा विद्यालय व कै.श्री.वसंतराव वैद्य विद्यालय या दोन शाळा असून विविध वस्तीपातळीवर बालवाड्या आहेत.संयुक्त स्त्री संस्था बालक आणि महिलांच्या उन्नतीसाठी काम करते. सन२०२२–२०२५ या वर्षाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे नीता रजपूत (अध्यक्ष), शुभदा उमराणी (कार्याध्यक्ष), लतिका गो-हे(उपाध्यक्ष), मधुरा जोगळेकर (चिटणीस क्रमांक १) अंजली सोलापूरे (खजिनदार), श्रीमती प्रिया कोरान्ने (चिटणीस क्रमांक २)

Leave a Reply

%d bloggers like this: