महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमथॉन स्पर्धेचे आयोजन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशातील पहिलीच भिमथॉन स्पर्धा पुणे शहरातून सुरु होत आहे. डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणारी हि स्पर्धा मॅरेथॉनच्या धर्तीवर आधारित आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वा. सारसबाग जवळील सणस मैदानापासून सुरु होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे समारोप होणार आहे. महिला, पुरुष व १८ वर्षाखालील युवा गटात लढत होणार आहे. विजेत्यांना ट्रॉफ़ी, मेडल, सर्टीफिकेट मिळणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना सर्टीफिकेट व मेडल मिळणार आहे.

देश अमृतमहोत्सवी बर्ष साजरे करित असताना समाज्यातील जातीय, धार्मिक बंधुभाव जपून सामाजिक एकता – समानतेचा संदेश देण्यासाठी भिमथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान जनजागृती, ऐक्याचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी मांडलेले विचार समाज्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी भिमथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याचे माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक क्रांती घडवून आणू शकतात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे किशोर कांबळे म्हणाले.

पत्रकार परिषदेस यावेळी भिमथॉन स्पर्धेचे आयोजक माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, स्पार्क फांउडेशचे किशोर कांबळे, पुणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे कार्यकारणी सदस्य सचिन आडेकर, नियोजन समितीचे रवि भोसले, सागर ढावरे, विजय जोरी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये शाळा, कॉलेजसह इतर स्वयंसेवी संस्थां व मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: