कोयता गॅंग ची सहकारनगर पोलिसांनी काढली धिंड
पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. स्थानिक गुंड राजरोसपणे हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक प्रकार बालाजीनगर येथे घडला. बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथे फुकट भाजी दिली नाही.म्हणून गुंडांनी संबंधित अल्पवयीन मुलाला कोयता काढत मारहाण करत पाया पडायला लावले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता .यानंतर सहकारनगर पोलीस खडबडून जागे झाले होते. संबंधितांवर आता गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती.त्या कोयता गॅंगला सहकारनगर पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे.
कोयत्याचा धाक दाखवून लोकांना मारहाण करणाऱ्या कोयता गँगवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सहकारनगर परिसरामधील कोयता गॅंगच्या 6 गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. ही कोयता गँग लोकांना पाया पडायला लावून मारहाण करायचे. पण पुणे पोलिसांनी या कोयता गँगला बेड्या ठोकल्या आहेत. तर 4 गुंड अजूनही फरार आहेत. अशी माहिती सहकार नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
